मदुरा मायक्रोफायनान्स च्या वतीने बार्शी पोलीस स्टेशनला सॅनिटायझर व मास्क भेट…

बार्शी प्रतिनिधी : ( दि.27 ) आर्थिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मदुरा मायक्रोफायनान्सच्या बार्शी शाखेच्या वतीने २७ मे बुधवारी सी एस आर फंडातून, कोरोना महामारीच्या काळात पोलिस बांधवांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर व मास्कची बार्शी शहर पोलीस स्टेशनला अनोखी भेट देऊन समाजहित जोपासण्याचे कार्य केले आहे.
याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, निर्भया पथकाचे -विकास माने, ठाणे अंमलदार – महेश मुंढे, श्री. नागरगोजे, महिला हेडकॉन्सटेबल -देशमुख मॅडम व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत, 70 सॅनिटायझर बॉटल आणि 70 मास्क भेट देऊन पोलिस बांधवांच्या कार्याबद्दल गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी मदुरा मायक्रोफायनान्सचे बार्शी शाखेचे शाखाधिकारी -सुरेश पवार, कॅशियर – इजहार शेख, गणेश कदम, योगेश निवरगे आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *