साकत येथे वृद्धास मारहाण करून ९३ हजाराची चोरी , गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास


वैराग (प्रतिनिधी )
साकत ता . बार्शी येथे सेवानिवृत्त वयोवृद्ध आरोग्य कर्मचाऱ्यास अज्ञात तीन चोरट्यांनी घराच्या गेटचे कुलुप तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी रॉडने मारहान करून सोने व रोख रक्कम मिळुन सुमारे ९३ हजाराची चोरी केली आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की एकनाथ दशरथ खटाळ ( वय ७१ ) रा. साकत ता .बार्शी हे पत्नी – कौशल्य एकनाथ खटाळ (वय 65) हे दोघे साकत ता .बार्शी येथे राहतात . त्यांना तीन मुले असून तिन्ही मुले नोकरी निमित्त बाहेरगावी राहण्यास आहेत . २७ जानेवारीला रात्री १० वा. पती-पत्नी जेवण करून घराचे सर्व दरवाजे बंद करून झोपले असता रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी घराच्या गेटचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला . त्यांनी डोक्यास टोपी , काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली होती . एकाने हातातील लोखंडी गजाने एकनाथ खटाळ यांना मारहाण केली असता त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने पत्नी जागी झाली . चोरटे पतीस मारहान करताना पाहून पत्नी, माझ्या पतीस मारू नका तुम्हाला हवं ते घेऊन जा असे चोरटयांना म्हणाली. म्हणून तिघांपैकी एकाने त्यांच्या हातातील कात्रीने पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे ( १ तोळे ५ ग्रॅ. ) मिनी गंठण , अर्धा तोळ्याचे सोन्याचे डोरले कापून घेतले .तसेच कपाटातील १२ हजार रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ९३ हजार किंमतीचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले .
याबाबत एकनाथ खटाळ यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली असून सदर घटनेचा अधिक तपास सपोनि – परजने करीत आहेत .

तिन्ही मुले नोकरी निमित्त बाहेरगावी
दोन मुले कोकणात शिक्षक म्हणून तर धाकटा मुलगा सहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर दिघी पोलीस ठाणे , पुणे येथे कार्यरत आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *