पुन्हा पेटला उजनीच्या पाण्याचा प्रश्न…. शेतकरी संघटनांचे धरणात जलसमाधी आंदोलन…


पंढरपूर (प्रतिनिधी )सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी नेले असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे . त्यावर नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत . आज विविध संघटनांसह शेतकरी संघटनां आक्रमक होत धरणात उतरून त्यांनी जलसमाधी आंदोलन केले .

सकाळपासून उजनी धरणा वरती पदाधिकारी व कार्यकर्ते जमा होऊ लागल्याने पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला होता. यानंतरही जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकरभैया देशमुख शेतकरी नेते अतुल खुपसे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळणवर, शिवसेनेचे संजय कोकाटे, अँड बापूसाहेब मिटकरी, रोपळे येथील औदुंबर गायकवाड, धनाजी गडदे, माऊली जवळेकर व शेतकऱ्यांनी उजनी धरणात उतरून आंदोलनाला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी आंदोलन थांबवण्याची विनंती केली यावरून पोलीस व आंदोलन करते यांच्यामध्ये खडाजंगी झाली.
कोणत्याही परिस्थितीमध्ये आश्वासक पर्याय निघाल्याशिवाय आंदोलन न थांबवण्याच्या निर्णयावर आंदोलक ठाम होते.
यावेळी धरणातील पाणी पळवा पळवी चा निषेध करीत पालकमंत्र्यांविरोधात चले जाव च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय….
जिल्ह्यातील शेतकरी बहुतांशी उजनी धरणावर अवलंबून असून या सतत होणाऱ्या पाणी पळवा पळवीमुळे जिल्ह्यातील शेती अडचणी येणार असून याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे यामुळे उजनी पाणी बचाव समितीतील तसेच शेतकरी संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आज उजनी धरणा मध्ये आंदोलन करून या पाणी पळवापळवी चा निषेध केला.
औदुंबर गायकवाड रोपळे, ता. पंढरपूर

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *