रातंजन ते हिंगणी रस्ता पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी

वैराग (प्रतिनिधी ) रातंजन (ता. बार्शी ) ते हिंगणी ( अंबाबाई मंदिर ) हा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून तीन किलोमीटर मंजूर आहे . रस्त्याचे काम अर्धवट असताना ते डिसेंबर 2016 मध्ये पूर्ण झालेचे दाखवले आहे .रस्ता तीन ठिकाणी खचून वाहून गेला आहे. त्यामुळे अर्धवट व बंद अवस्थेतील रस्ता त्वरीत पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ करित आहेत .
रस्त्याचे काम अर्धवट असून रस्त्यावरील दोन पूल वाहून गेले आहेत. मोठ्या नळ्या उघड्या पडल्या मुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.
रस्त्या अभावी या भागातील शेतकऱ्यांना या रस्त्याने जाणे येणे, मालाची वाहतूक करणे, शेतीची अवजारे, बैलगाडी, ट्रॅक्टर इत्यादी साहित्य किंवा वाहन घेऊन आपल्या शेतामध्ये जाता येत नाही. त्यामुळे अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
याबाबत रस्त्याची पाहणी करून रस्ता पूर्ववत करणेची मागणी रातंजन चे शेतकरी गिरीश शेषराव बडवे व महादेव सुबराव खडके यांच्यासह गावातील 209 शेतकऱ्यांनी लेखी निवेदन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बार्शी पंचायत समिती आदींना दिलेले आहे. तरीही अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही .

रातंजन ते हिंगणी रस्त्याचे काम अर्धवट दिसत आहे .
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *