स्वाभीमानीचे सक्तीच्या वीजबिल वसुली व तोडणी विरुद्ध वैरागात रास्तारोको ..

वैराग (प्रतिनिधी)लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा व सक्तीची विजबिल वसूली थांबवून कनेक्शन तोडणे तात्काळ थांबवा व थकीत ऊसबिले तात्काळ जमा करा या मागणीसाठी शुक्रवारी १९ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक चे जिल्हाध्यक्ष -विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी – सोलापुर मार्गावर वैराग ता.बार्शी येथिल शिवाजी चौकात रास्तारोको करण्यात आले.
लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आहेत ,त्यातच ऊसाची बिले मिळालेली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना वीजबिल भरणेसाठी आर्थिक अडचण आहे . अशातच विज मंडळाकडून सक्तीची वीजबिल वसुली होत असून थकबाकी दार शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरु आहे ती तात्काळ थांबवावी .

लॉकडाऊन च्या कालावधीत सर्वांचे नोकरी, व्यवसाय, रोजगार बंद होते त्यामुळे लॉकडाऊन च्या कालावधीतील वीजबिल शासनाने माफ करावे . लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारा देखिल विजय रणदिवे यांनी यावेळी दिला
सुमारे अर्धातास चाललेल्या रास्तारोको मुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्या होत्या , त्यामुळे वैराग येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौकात वाहतूक काही काळ खोळंबली होती .
यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागण्यांचे निवेदन विज वितरणचे – सहाय्यक अभियंता गुजर मॅडम ,वैरागचे मंडल अधिकारी – धनकवडे यांना देण्यात आले .या आंदोलनात हणमंत कापसे , चंद्रकांत निचळ, विजय साठे , दिनेश शिंदे , धर्मराज पंके , रामेश्वर पंके . सचिन मस्के , समाधान यादव, शरद निचळ, केशव जगताप, महादेव शिंदे यांच्यासह राळेरास ,धामणगाव , रातंजण ,जवळगाव तसेच वैराग भागातील शेतकरी व स्वाभीमानी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते . या प्रसंगी सचिन मस्के , दिनेश शिंदे यांनी विचार व्यक्त केले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *