पुणे शिक्षक संघटनेचे प्रश्न लवकर मार्गी लावणार – शिक्षणाधिकारी – भास्करराव बाबर

सोलापूर (प्रतिनिधी):पुणे शिक्षिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रा . हणुमंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी २२ रोजी सोलापूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात शिक्षण उपसंचालक – औदुंबर उकिरडे साहेब व शिक्षणाधिकारी (सोलापूर ) भास्कराव बाबर साहेब यांना भेटून शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केली . त्यावर येत्या ८-१० दिवसांमध्ये संघटनेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी – बाबर साहेबांनी यावेळी दिले .
यावेळी पुणे शिक्षिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष – माजी प्राचार्य – हणुमंत चव्हाण ,सेक्रटरी – उमाकांत शेळके, पुणे जिल्हा अध्यक्ष- मुस्तफा सय्यद , सोलापूर जिल्हा अध्यक्ष- शंकर धावारे , बार्शी तालुकाध्यक्ष -बलभिम लोखंडे ,दिलीप चव्हाण ,दिपक पाटील , प्रकाश कांबळे व दिपक खंदारे आदी उपस्थित होते.

पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सोलापूरचे शिक्षणाधिकारी मा. भास्करराव बाबर साहेब यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *