खा .संभाजीराजे यांना मराठा आरक्षण नेतृत्वास जाहीर पाठींबा.. मुस्लीम आरक्षणासाठी प्रयत्न करण्याची मागणी….

सोलापूर- Iप्रतिनिधी मा. एम.जी. गायकवाड समितीच्या अहवालावर मराठा समाजाला दिलेले १६% आरक्षण रद्दबातल ठरविणारा सुप्रीम कोर्टाचा निकाल यामुळे समाजात असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमिवर खा . छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे . तसेच आरक्षण संदर्भात अन्य योग्य ते मार्ग सुचविण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत ओबीसी आरक्षण चळवळीतील जेष्ठ नेते आणि तज्ञ सल्लागार कॉम्रेड – रामभाऊ गणाचार्य यांच्या नेतृत्वाखाली हसीब नदाफ ,माऊली पवार,राम गायकवाड, विष्णू गायकवाड, शौकत पटेल, वसीम पठाण,ईस्माईल पटेल जिल्हा अध्यक्ष आदी विविध संघटनाच्या प्रतिनिधींनी खासदार संभाजीराजे यांची नुकतीच सोलापुरातील शासकीय निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा केली. यावेळी लिखित सूचनाही केल्या. त्यानुसार, आजच्या परिस्थितीत मराठा आरक्षण टिकण्यासाठी व त्याला कायदेशीर, संविधानिक स्वरूप निर्माण होणेकामी महाराष्ट्र शासनाने ठराव करुन केंद्र शासनाकडे पाठवावा व केंद्र शासनाने सदर ठराव लोकसभा व राज्यसभेत मांडून मंजूर करावा.सदर आरक्षणाचा ठराव संविधानाच्या ९ व्या सुचीत समाविष्ट करुन संरक्षण द्यावे.अशी मागणी यावेळी चर्चेव्दारे करण्यात आली.
राज्य सरकारने केद्राकडे पाठपुरावा करणे व केंद्र सरकारची प्रामाणिक इच्छाशक्ती या बळावर आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी खा. संभाजीराजे प्रयत्नशिल आहेत .

मुस्लिम आरक्षणासाठीहि प्रयत्न करणेची आझाद विचार मंचची मागणी …

सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा कमिटी, डॉ. महमूद रहमान गटाने केलेल्या शिफारसीनुसार मुस्लीम समाजाला ५% आरक्षण मिळवून देणेसाठी सुद्धा आपण नेतृत्व स्विकारून प्रयत्न करावे व शाहु महाराजांची सामाजिक न्यायाची परंपरा अबाधित ठेवावी अशी विनंती मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हा अध्यक्ष इस्माईल पटेल यांनी केली. याबाबत खा . संभाजीराजे यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *