मराठा आरक्षणासाठी शासनाचा घरावरती काळे झेंडे लावून निषेध


बार्शी । प्रतिनिधी
मराठा आरक्षण लढ्याची गंभीरपणे दखल न घेणाऱ्या केंद्र व राज्यसरकारचा निषेध म्हणून २३ मे रविवारी बार्शी शहरातील मराठा समाज बांधवांनी आपल्या घरावरती काळे झेंडे लावून निषेध नोंदवला .

लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज्याला आरक्षण लागू करावे अन्यथा कोरोना विषाणूची परिस्थितीत सुधारल्या नंतर मराठा समाज तीव्र आंदोलन करून मराठा आरक्षण मिळवल्या शिवाय शांत बसणार नाही अशी भावना
अनेक मराठा बांधवांनी व्यक्त केली .
या आंदोलनामध्ये अनेक मराठा बांधव सहकुटुंब सहपरिवार सहभागी झाले होते . कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन घरावर काळे झेंडे लावून घरी राहून आंदोलन करण्यात आले . भविष्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच्या भावना मराठा बांधवांकडून व्यक्त होत होत्या .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *