सोलापूरच्या कुलगुरू फडणवीस यांच्या हस्ते प्रतिक्षा गव्हाणेचा सत्कार

कुलगुरू फडणवीस यांचें हस्ते प्रतीक्षा गव्हाणे हिचा सन्मान करताना

वैराग:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा ऑनलाइन दीक्षांत समारंभ सोमवारी(ता.२२)सकाळी ११ वाजता महामहिम राज्यपाल,कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सन २०१९-२० वर्षातील श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीची विद्यार्थिनी प्रतीक्षा गव्हाणे हिने बी.एस्सी रसायनशास्त्र विद्यापीठमध्ये प्रथम व संपूर्ण बी.एस्सी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्णकामगिरी केली आहे. महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ऑनलाईन उपस्थीतीत दोन सुवर्णपदक विजेती प्रतीक्षा गव्हाणे हिचा सन्मान कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांचें हस्ते संपन्न झाला.

दीक्षांत समारंभासाठी प्रमुख उपस्थिती कुलगुरू मृणालिनी फडणवीस,श्रेणीक शहा,आ.सुभाष देशमुख,डॉ बी.वाय यादव,प्रभाकर गव्हाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रतीक्षा गव्हाणे श्री.नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ,मळेगांव सेवकांची पतसंस्थेचे चेअरमन प्रा.प्रभाकर गव्हाणे यांची कन्या आहे.श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात,मार्गदर्शक रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. टी.एन.लोखंडे व सर्व प्राध्यापक वृंद यांचे मार्गदर्शन मिळाले.तिच्या उज्वल यशाबद्दल श्री शिवाजी महाविद्यालय बार्शीचे प्राचार्य डॉ प्रकाश थोरात,श्री.नर्मदेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पिसाळ व्ही. बी,सचिवा मातोश्री एस एन.गडसिंग (मॅडम),खजिनदार ज्ञानदेव आगलावे,संचालक एल. वाय.पाटील,सहसचिव हेमंत (बापू)गडसिंग,उपाध्यक्ष प्रमोद जगताप,संचालक विलास मिरगणे,प्राचार्य विकास बोराडे,सेवकांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रभाकर गव्हाणे तसेच सर्व संचालक मंडळ,विविध संस्थेचे प्राचार्य,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,बावी व मळेगाव ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *