योगशिक्षक आणि मुल्यांकनकर्ता परीक्षेत प्रणित देशमुख यशस्वी


वैराग/प्रतिनिधी – भारत सरकारच्या आयुष मंत्रालय संचलित योगा प्रमाणीकरण मंडळ नविदिल्ली द्वारा घेतल्या जाणाऱ्या योग शिक्षक व मुल्यांकनकर्ता या संपूर्ण देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत वैराग येथिल मुख्याध्यापक प्रणित देशमुख यांनी यश मिळवले.

सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने प्रात्यक्षिक व सिद्धांतीक  स्वरूपात घेतली जाते.
या परीक्षेसाठी त्यांना पतंजली योगपिठाचे श्रीराम लाखे,रत्नाकर कुलकर्णी,वल्लभ जोशी , डॉ.प्रशांत सोनवणे यांचे मार्गदर्शन मिळाले. अंबिका योगाश्रम आणि मान्यवरांच्या  वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यापुढे योग प्रसार आणि प्रचाराचे कार्य  करणार असल्याचे  योगगुरू प्रणित देशमुख यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *