पत्रकार दिनानिमित्त वैराग मधील विविध शासकीय कार्यालये व संस्थांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार संपन्न

वैराग ( प्रतिनिधी )
वैराग येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून ६ जानेवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने वैराग शहरातील विविध सामाजिक संस्था , शासकीय कार्यालये , पतसंस्था व तसेच मान्यवर व्यक्ती यांचेकडून पत्रकारदिनी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला .
आण्णा ग्रुप –येथील “आण्णा ग्रुप ‘ च्या वतीने वैराग मधील सर्व पत्रकारांना लेखनी देवून पुष्पहार व फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी आण्णा ग्रुपचे प्रमुख वैजीनाथ आदमाने ,मेजर जगन्नाथ आदमाने , किरण वाघमारे , सचिन पानबुडे , महेश पन्हाळे , अजीत भोसकर , सतीश करंडे , लक्ष्मण बचुटे ,जिन्नस उमाप, इस्माईल पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वैराग ग्रामपंचायत – वैराग ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतिच्या वतीने पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला .राष्ट्रवादीचे नेते -निरंजन भूमकर , संगमेश्वर डोळसे, माजी ग्रा. प. सदस्य – राजेंद्र खेंदाड , राजकुमार पौळ , श्रीशैल्य पाटील, अरुण सावंत, सलीम शेख, बाबा शेख ,दादा मोहिते, ग्रामविकास अधिकारी – सचिन शिंदे , कार्यालयीन अधीक्षक श्री .विलास मस्के, रामभाऊ जाधव व इतर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .
यावेळी जेष्ठ पत्रकार -धनाजी शिंदे, आनंदकुमार डुरे, किरण आवारे, कुलभूषण विभूते, आण्णासाहेब कुरुलकर, बार्शी परिवर्तनचे संपादक -बलभीम लोखंडे, भागवत वाघ,चंद्रकांत खेंदाड, आप्पा दळवी , भिष्माचार्य ढवण, रामदास पवार , गणेश अडसूळ, मुज्जमिल कौठाळकर ,शुभम गोवर्धन , आदी पत्रकार बंधूचा शाल, श्रीफळ , मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
शारदादेवी प्रशाला कै .उद्धवरावजी पाटील क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारदादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने वैराग शहर व भागातील पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी संस्थाध्यक्ष – संतोष निंबाळकर , प्राचार्य संतोष सरवळे , पर्यवेक्षक – नेताजी घायतिडक , भाऊसाहेब काशीद ,महादेव पवार ,पोपट सरकाळे ,किरण भानवसे , किरण निंबाळकर आदी शिक्षक उपस्थित होते .
लोकमंगल पतसंस्था वैराग शाखेच्यावतीने पत्रकारांचा शाल ,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला . याप्रसंगी शाखेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा शाखाधिकारी नितीन म्हेत्रे यांनी सांगितला . अमोल साठे धनंजय मोरे ‘ क्षिरसागर , दिपाली कापसे, सोनाली जगताप उपस्थित होते .
राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला . यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व रोहित दादा पवार युवा ब्रिगेड सोलापूर जिल्हा अध्यक्ष – समाधान पवार, महिला जिल्हा उपाध्यक्षा – शालाका मरोड -पाटील, राष्ट्रवादीचे नेते -अरूण सावंत ,वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत गुंड व इतर मान्यवर उपस्थित होते .
बाळासाहेब भूमकर वाढदिवस सत्कार समितीच्या वतीने भूमकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार करण्यात आला .दैनिक पुण्यनगरीचे – किरण आवारे , आनंद कुमार डुरे ( पुढारी ) बार्शी परिवर्तन चे संपादक -बलभीम लोखंडे ,माय मराठी न्यूज चॅनलचे संपादक – निलेश उबाळे , जनता न्यूजचे प्रतिनिधी -गणेश अडसूळ यांचा सन्मान करण्यात आला .यावेळी मकरंद निंबाळकर , तेजस्वीनी मरोड ,जि . प . सदस्या – रेखाताई भूमकर , निरंजन भूमकर , अमोल भुमकर , मृणाल भूमकर ,आकाश भूमकर व भुमकर परिवारातील सर्व सदस्य .हितचिंतक . ग्रामस्थ उपस्थित होते.

वैराग येथे आण्णा ग्रुपच्या वतीने सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकारांसमवेत – वैजिनाथ आदमाने ‘ मेजर जगन्नाथ आदमाने , सचिन पानबुडे , किरण वाघमारे , महेश पन्हाळे , भोसकर , बचुटे आदी
वैराग ग्राम पंचायत कार्यालयात सत्कार प्रसंगी निरंजन भूमकर , अरुण सावंत , कुमार पौळ , ग्राम विकास अधिकारी सचिन शिंदे आदी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष व रोहित पवार युवा ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष – समाधान पवार, महिला जिल्हा उपाध्यक्षा – शालाका मरोड -पाटील, -अरूण सावंत , डॉ. गुंड
शाखाधिकारी नितीन म्हेत्रे . अमोल साठे ,धनंजय मोरे ‘ क्षिरसागर
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *