एक लाख रुपये किलोची भाजी ‘जगातील सर्वात महागडी भाजी’ ; बिहार चा शेतकरी घेतोय उत्पादन……..

जगातील सर्वात महागड्या भाजीची किंमत एक लाख रुपये प्रति किलो आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
मात्र त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भाजीची प्रायोगिक तत्वावरील लागवड बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केलीय.
या भाजीचं नाव आहे हॉप शूट्स
खरं तर या भाजीचं उत्पादन ११ व्या शतकामध्ये करण्यात आलं आहे.
ही वनस्पती त्यावेळी बियरमध्ये फ्लेवर आणण्यासाठी वापरली जायची.
नंतर या वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून आणि आता थेट भाजी म्हणून करण्यात येऊ लागलाय.
शूट्सला एवढी किंमत असण्यामागील कारण म्हणजे या वनस्पतीमध्ये दोन खास प्रकारची अ‍ॅसिड मिळतात.
या अ‍ॅसिडची नावं आहे
ह्यूमोलोन्स आणि ल्यूपोलोन्स. या अ‍ॅसिडच्या मदतीने मानवी शरीरामध्ये अनियंत्रित पद्धतीने वाढणाऱ्या कॅन्सरच्या पेशींवर उपचार करता येतो असं मानलं जातं.
कॅन्सरसारख्या आजारावर मात मिळवण्यासाठी या वनस्पतीमधील अ‍ॅसिड उपयोगी असल्यानेच तिला एवढा भाव मिळतो.

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील नवीननगर ब्लॉकमधील करमडीह गावातील ३८ वर्षीय शेतकरी अमरेश सिंह हे या भाजीचं उत्पादन घेणारे पहिले भारतीय शेतकरी ठरलेत.
सहा वर्षांपूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये एका किलो हॉप शूट्स एक हजार पौंडांना विकले होते.
भारतीय चलनानुसार ही किंमत किलोमागे एक लाख रुपये इतकी होते.
अर्थात ही भाजी इतकी महाग असल्याने ती भारतात खूपच कमी मिळते.
खरं तर विशेष मागणी केल्यानंतर ती उपलब्ध करुन दिली जाते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *