नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्या शिवाय राहणार नाही : आ. बबनदादा शिंदे

पुरग्रस्त भागाची पाहणी करताना ग्रामस्तांसमवेत माढा तालुक्याचे आमदार मा. बबनदादा शिंदे

बार्शी परिवर्तन न्यूज / विजय शिंदे
दारफळ सिना दिं. 21 :
 सिना नदी परिसरातील गावांमधील अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतक-याचा ऊस रस्ता वाहतुकीस योग्य झाल्यानंतर विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या माध्यमातून उचलला जाईल, अतिवृष्टी मुळे नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्या शिवाय राहणार नाही याची दक्षता अधिकारी वर्गाने घेतली पाहिजे. नदी काठच्या परिसरातील वाडी वस्तीवरील विजेचा प्रश्न दोन तीन दिवसात मार्गी लावला जाईल.माढा तालुक्याचे आ. बबनदादा शिंदे यांनी बुधवारी 21 रोजी सिना नदी काठावरील तांदुळवाडी, रिधोरे, वडशिंगे, निमगाव मा, सुलतानपुर, महातपुर, दारफळ या गावामध्ये नदीला आलेल्या महापुर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पहाणी केली. नुकसानग्रस्त शेतक-यांशी चर्चा केली. त्यांच्या समवेत सर्व विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. यामध्ये माढ्याचे नायब तहसीलदार जाधव साहेब,विद्युत मंडळाच्या सहा.शाखा अभियंता -प्रिया राठोड, क.अभियंता धारूरकर, मंडळ निरीक्षक कोकरे,सा.बां विभागांचे शाखा अभियंता – नाईकवाडी साहेब, तलाठी – ढवण, ग्रामसेवक – समाधान जाधव, आदी विभागाचे अधिकारी होते. आ .बबनदादा शिंदे दारफळ सिना याठिकाणी काॅर्नर सभेमध्ये बोलताना म्हणाले की,

दारफळ बंधा-याची दुरुस्ती लवकर केली जाईल. पडझड झालेल्या घरांचे व मृत्यूमुखी पडलेल्या मुक्या जनावरांचा पंचनामे तातडी करा अशा सुचना त्यांनी अधिकाय-यांना केल्या. अतिवृष्टीमुळे जे रस्ते खराब झाले आहेत त्या रस्त्याची दुरुस्ती शासना कडून जसा निधी प्राप्त होईल त्याप्रमाणे मार्गी लावण्यात येतील. या काॅर्नर सभेचे प्रास्ताविक अशोक शिंदे यांनी केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती – सुहासकाका पाटील जामगावकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती – बाळासाहेब शिंदे, माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन – अशोक लुणावत, प्रदीप कांबळे, उपसरपंच -शिवाजी बारबोले, चेअरमन -विठ्ठल शिंदे, पोलीस पाटील -हौसाजी पाटील , माजी सरपंच – ज्ञानदेव उबाळे, राजेंद्र गुंड, आमदार बबनदादा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक नितीन मराठे, बापु शिंदे, शिवाजी उबाळे भाऊसाहेब, सर्जेराव सुळे, प्रतापराव साठे, कुमार शिंदे, महादेव शिंदे, विठ्ठलराव शिंदे सह साखर कारखान्याचे कर्मचारी व दारफळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार माजी उपसभापती बाळासाहेब शिंदे यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *