वैराग नगरपंचायतीच्या यशाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने निरंजन भूमकर यांचा सत्कार

वैराग : प्रतिनिधी
वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याची अंतिम उद्घोषणा राज्याच्या नगरविकास विभागाने मंगळवारी प्रसिद्ध केली . त्यामुळे वैराग ग्रामपंचायत आता नगरपंचायत म्हणून ओळखली जाणार आहे . वैरागकरांनी दाखवलेल्या एकजुटीचा आणि निरंजन भूमकर यांनी केलेल्या पाठपुराव्याचा हा विजय असल्याचे बोलले जात आहे.यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करित निरंजन भूमकर यांचा सत्कार करण्यात आला .

वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर केल्याबद्दल विलास मस्के, रामभाऊ जाधव, कमलाकर लोखंडे, लक्ष्मण माने, अमजद शेख, सुदाम खेंदाड, सचिन पाणबुडे, किरण वाघमारे, अण्णासाहेब आडके, सुभाष सातपुते, रफिक शेख, फैयाज तांबोळी, पांडुरंग चव्हाण, राजू थोरात, नागेश भालशंकर, रमजान शेख, नंदकुमार मोहिते, सुरेश कावरे, रवींद्र जाधव, तुकाराम जाधव, मयूर जाधब, अक्षय जाधव सर्व ग्रा.प.कर्मचारी ,आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचारी यांच्या वतीने निरंजन भूमकर यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी संगमेश्वर डोळसे, राजकुमार पौळ, राजाभाऊ खेंदाड, हनुमंत पांढरमिसे, सलीम शेख, चाँदसाहेब दगडफोडे, श्रीशैल पाटील, किशोर इंगळे आदी उपस्थित होते .

वैराग ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत मध्ये होणेसाठी सर्व पक्षीय मागणी वारंवार करण्यात येत होती. याबाबतचा २६ जानेवारी २०२१ च्या ग्रामसभेत घेण्यात आला होता. १७ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या वैराग ग्रामपंचायतची निर्मिती ८ ऑगस्ट १९३६ रोजी म्हणजे सुमारे चौन्याऐंशी वर्षांपूर्वी झालेली आहे.

सद्या वैरागची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार झाली आहे . गावाच्या विकासाला चालना मिळावी म्हणून वैराग ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये करावा असा ठराव करण्यात आला होता. वैरागची बाजारपेठ पंचक्रोशीत नावाजलेली आहे .कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा येथे आहे. सध्या वैराग मधील सहा वार्डातील १४३३९ इतकी मतदार संख्या असून यात ७३०९ पुरुष व
७०२९ स्त्री मतदार संख्या आहे. या अंतिम उद्धघोषणेमुळे वैराग ग्रामपंचायतची नगरपंचायतीमध्ये रूपांतर होण्याची प्रतीक्षा संपली असून आता पुढील कामकाज नगरपंचायत म्हणून होणार आहे. यासाठी प्रशासक म्हणून बार्शीच्या तहसीलदारांकडे कार्यभार सोपवण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर व्हावे यासाठी निरंजन भुमकर यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले .
वैराग ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामिण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी व संक्रमणात्मक क्षेत्रासाठी वैराग नगरपंचायत नावाने घटीत करण्यासाठी अधिसूचना काढण्याच्या प्रस्तावावर आक्षेप मागिवले होते.अधिसूचना अ व ब मधील नमूद बाबीवर उद्घोषणा केल्यापासून ३ हरकतीचा निपटारा करून घोषणा करण्यात आली.
वैरागच्या संतनाथ मंदिराध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकजुटीने घेतला होता. त्यामुळे हा सर्व वैरागकरांचा विजय बनला आहे.
मुंबईत मंत्रालयामध्ये मंगळवारी वैराग नगरपंचायतीची घोषणा करण्यात आली. घोषणेचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन भुमकर यांना देण्यात आले .यावेळी आ.संजय मामा शिंदे, आ. यशवंत माने, दिपक साळुंखे पाटील, उमेश पाटील, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, बालाजी पवार आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *