कोल्हापूर राष्ट्रवादीच्या निरीक्षक पदी जयमाला गायकवाड यांची निवड.


सोलापूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष -दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या भगिनी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांची कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक पदी निवड झाली असून तशा आशयाचे पत्र मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा मा.सौ.रूपालीताई चाकणकर व महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकासमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यात केलेल्या दमदार कामगिरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पक्षाची मोठी जबाबदारी जयमालाताई गायकवाड यांच्यावर सोपवली आहे.
सदर निवडीनंतर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बळीरामकाका साठे, आ. बबनदादा शिंदे, आ.भारतनाना भालके, मा .आ .राजनजी पाटील, आ.यशवंत माने,सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सौ अनिता ताई नागणे, सोलापूर जिल्हा निरीक्षक दीपालीताई पांढरे, जि. प. सदस्य उमेश पाटील, लतीफभाई तांबोळी, राजेंद्र हजारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *