गर्भवती पत्नीचा खून, प्रेयसी बरोबर करायचं होत लग्न , कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा


बार्शी (प्रतिनिधी) प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी अडसर ठरणाऱ्या आपल्या गर्भवती पत्नीच्या डोक्यात दगड घालून व चाकूने खून केला . याबाबत आरोपी महेश मिसाळ ( वय-२४ )रा. खामसवाडी ता. कळंब यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
दादाराव महादेव फुगारे रा.कोंबडवाडी ता.जि.उस्मानाबाद यांची मुलगी मनीषा हिचा विवाह खामसवाडी येथील महेश भारत मिसाळ यांचे सोबत ७ मे २०१७ रोजी झाला होता. महेश पुणे येथे मयत मनीषा बरोबर राहत होता.मनीषा ही गर्भवती होती . महेश मिसाळचे नात्यातील मुली सोबत प्रेमसंबंध होते. तो नेहमी त्याच्या प्रेयसीच्या संपर्कात होता.पत्नी मनीषा ही त्याच्या लग्नासाठी अडसर ठरत असल्याने महेशने पत्नीस प्रथम तिच्या माहेरी कोंबडवाडी येथे नेले व तेथून तो त्याच्या बहिणीच्या गावी पाथरी ता.बार्शी येथे गेला . तेथुन परतताना मनीषास येडेश्वरी येथील
जंगलात नेहून मनीषावर पाठीमागून दगडाने मारून व चाकूने वार करून खून केला व स्वतः जखमी होवून उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ॲडमिट झाला.
मयताचे वडील फुगारे यांनी पांगरी येथील पोलिसांत तक्रार दिली होती .
सरकार पक्षातर्फे अॅड .शांतवीर महिंद्रकर आरोपीतर्फे अॅड.मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.यात महत्वाचे म्हणजे  तपास अधिकारी सपोनि – धनंजय ढोणे व पांगरी पोलिस ठाण्याचे हवालदार दिपक परबत त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *