महागांव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.जनाबाई पवार , उपसरपंचपदी श्री हनुमंत मोरे

सरपंचजनाबाई पवार

बार्शी तालुक्यातील महागांव ग्रामपंचायतीवर जय हनुमान महाविकास आघाडीच्या सौ.जनाबाई राजू पवार व उपसरपंचपदी श्री हनुमंत संभाजी मोरे यांची बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून श्री काशिद यू.बी साहेब यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक श्री खोबरे एस.एस उपस्थित होते.

उपसरपंच श्री हनुमंत मोरे

७ सदस्य आसलेल्या महागांव ग्रामपंचायतीमध्ये जय हनुमान महाविकास आघाडीने ५ जागा जिंकून बहुमत प्राप्त करून ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला. सदर निवडी प्रसंगी , सौ. जनाबाई राजू पवार, श्री हनुमंत संभाजी मोरे , सौ.अश्विनी अरूण पाटील, सौ.दिपाली विशाल चापले, सौ.ज्योती मेघनाथ गायकवाड हे नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, निवड प्रक्रियेनंतर नूतन सरपंच,उपसरपंच,सदस्य यांचा सत्कार सोसायटी चेअरमन श्री कल्याण घोलप,माजी सरपंच बाळासाहेब पाटील, मा. उपसरपंच श्री बिभीषण घोलप, मा. उपसरपंच श्री सुभाष घोलप, मावळते उपसरपंच श्री अनिल घोलप ,शालेय समिती अध्यक्ष श्री संतोष गोरख घोलप , मा. उपसरपंच श्री विलास कोकरे, विलास घोलप, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री आण्णासाहेब पाटील,अरूण पाटील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी शंकर वसंत घोलप,शहाजी घोलप, श्रीहरी मोरे, विजयकुमार घोलप, हनुमंत कांबळे, कमलाकर चापले,डॉ. अमोल मोरे,डॉ.मेघनाथ गायकवाड, उमेश घोलप,शंकर मोरे,शंकर चापले, शशिकांत मोरे,विशाल चापले,समाधान पाटील,रामभाऊ चापले,नारायण चापले, मारूती कोकरे,सुखदेव ढावारे,मोहन गायकवाड, पोपट महाराज घोलप, बाबा मोरे, लक्ष्मण चापले, ऋषीकेश पाटील ,धर्मराज चापले,दयानंद कोकरे,गोरख कोकरे व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, ग्रामस्थांनी सरपंच ,उपसरपंच, नवनियुक्त सदस्य यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *