वैराग लाँकडाऊन बाबत स्थानिक प्रशासन व ग्राम व्यवस्थापन समितीची बैठक

वैराग (प्रतिनिधी ) राज्यात सध्या कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे . त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १ एप्रिल पासून नविन नियमावली जारी केली आहे . अशातच वैराग येथे ०३ मार्च २०२१ च्या अहवालानुसार एकूण कोरोना रुग्ण-२७ असून त्यापैकी १० बरे झालेत व १ मयत आहे .सध्या १६ बाधित रुग्णांमध्ये ( होम आयसोलेशन -१४, हिरेमठ हॉस्पिटल बार्शी-१ व अश्विनी हॉस्पिटल सोलापूर-१) असे आहेत . याबाबत ग्राम स्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची रविवारी सकाळी वैराग ग्रामपंचायतीमध्ये बैठक झाली .
सदरचे कोरोना रुग्ण परिसर माहिती पुढील प्रमाणे : शिवाजी नगर १, धायगुडे प्लॉट-२, घोंगडे प्लॉट-७, इंदिरा नगर-२ व खरटमोल प्लॉट-२ असे आहेत.
याबाबत बैठकित पुढील विषयावर सविस्तर चर्चा झाली :
ज्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावा. दंडात्मक कार्यवाही साठी ग्रामपंचायत कर्मचारी सोबत पोलीस कमर्चारी असावा असे मत निरंजन भूमकर यांनी मांडले. कोरोना बाधित रुग्णाबद्दल स्थानिक पुढाऱ्यांचा हस्तक्षेप नको .
जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडील ०१ एप्रिल२०२१ रोजीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या नागरिक, संस्था, दुकाने इत्यादी वर प्रशासकीय कार्यवाही करून दुकाने सिल करण्यात येईल असे मत पोलीस निरीक्षक श्री.विनय बहिर यांनी मांडले.
वैराग प्रतिबंध क्षेत्र घोषित केल्यास लोकांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे वैराग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करू नये , सर्व दुकानात नियमाचे पालन होते कि नाही याची स्थानिक प्रशासनाने दखल घेवून कायदेशीर कार्यवाही करावी असे मत व्यापारी प्रणीत गांधी यांनी मांडले.
शासनच्या नियमानुसार ज्या गावात १५ पेक्षा जास्त कोरोन बाधित रुग्ण आढळून आले ते गाव पूर्ण प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यास येईल असे मत तलाठी सतिश पाटील व ग्रा. वि. अ. सचिन शिंदे यांनी मांडले.

बैठकीत खालील विषयांचा आढावा घेण्यात आला.
१) वैरागतील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधित लस घेण्यास प्रोत्साहन करणे .
२) गावातील नागरिक शासनाने दिलेल्या सुचने प्रमाणे Social Distancing चे नियम पाळत आहेत. लग्न समारंभ किंवा गर्दी होणारे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
३) नागरिकांना कोरोना विषाणू संदर्भात , स्वच्छतेच्या संदर्भात दररोज दवंडी देवून त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
४) परगावाहून आलेल्या नागरिकांना तपासणी करून घेणेबाबत व विलगीकरणाबाबत सुचना देण्यात येत आहेत.
५) गावातील किराणा दुकाने व रेशन दुकाने आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करते आहेत.
६) गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईट धुळी फवारणी करणेत येत आहे.
७) सदर समितीमधील सदस्य ,सचिव यांचे नोंदवहीत स्वाक्षरी करीत आहेत.
८) गावामध्ये परराज्यातील एकही नागरिक आढळून आलेला नाही.
९) गावामध्ये परगावाहून आलेल्या लोकांना कोरोना व्हायरसची काही लक्षणे आढळून आंल्यास अथवा शंका आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग येथे तपासणी करून घेणेत यावी असे सांगितले.
१०) गावातील सर्व खाजगी दवाखाने सुरु राहतील याची दक्षता घेण्यात आली.

वैराग गावातील जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळून इतर सर्व दुकाने सकाळी ७:०० ते सायं ७:०० वा पर्यंत सोमवार ते शुक्रवार पर्यंत नियम व अटीचे पालन करून चालू राहतील तसेच इतर दुकाने शनिवार व रविवार रोजी बंद राहतील.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *