निराधार वृद्धेचे भूकबळी पासून वाचविले प्राण , माणुसकी जपत पत्रकार शेळके सह अनेकजण धावले वृध्देच्या मदतीला

बार्शी (प्रतिनिधी )एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ… या उक्तीप्रमाणे बेलगाव ता बार्शी येथे दोन दिवस भुकेने व्याकुळ झालेल्या आणि शरीर प्रकृती खालावलेल्या अनोळखी वृद्ध महिलेस दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून खऱ्या अर्थाने माणुसकी जपत पत्रकार धिरज शेळके आणि बेलगाव च्या युवकांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

बेलगाव परिसरामध्ये दोन दिवसापासून एक आज्जीबाई एकाच ठिकाणी झोपून होती . त्यांची प्रकृती अतिशय खालावली होती . सदर घटना गावातील युवकांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल संपादक – पत्रकार संघांचे बार्शी तालुका सहसचिव पत्रकार धिरज शेळके यांना फोनद्वारे कळवळी . धिरज शेळके यांनी आज्जीला बार्शीला घेऊन येण्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब शेळके यांनी युवकांना आधार आणि प्रेरणा देत बार्शीला घेऊन जाण्याचे सांगताच, बार्शी येथील चांडक इंडस्ट्रीज मध्ये कामाला असणारे गावातील तरुण नुकतेच कामावरून घरी आलेले असताना त्यांनी रोहिदास भालेराव यांच्या ओमिनी व्हॅन मधून अमित जगदाळे, बाळासाहेब कांबळे, दादासाहेब शेळके, ज्ञानेश्वर जगदाळे, अक्षय पवार यांनी रात्री 11:30 वाजता बार्शी ग्रामीण पोलिस स्टेशनला घेऊन आले. यावेळी पत्रकार शेळके यांनी अनोळखी व्यक्तीची नोंद करून त्यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयामध्ये दखल करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी वर्दीतली माणुसकी दाखवत, ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्याचे आदेश पोलीस सहकार्यांना दिले.

बार्शी ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार प्रदीप केसरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोन्दर, होमगार्ड शिवाजी कर्नावळ, शिवाजी शिंदे, सुशील बंगाळे यांच्या सहकार्याने त्या महिलेस त्वरित बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्री 12:15 ला दाखल करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. शितोळे यांना सदरील घटनेची माहिती देताच त्यांनी तपासणी करून त्वरित उपचार केले. रात्री उपचारानंतर ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगताच एका वृद्ध महिलेचे जीव वाचल्याचे समाधान सर्वाच्या चेहऱ्यावर दिसून आले .

गौडगाव येथील निवारा अनाथाश्रमाचे राहूल भड यांनी महिलेस सांभाळण्याचे आश्वासन दिले . पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि बेलगाव येथील युवक व धिरज शेळके यांनी केलेल्या माणुसकीच्या कार्याबद्दल बार्शी तालुका आणि परिसरातून कौतुक होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *