संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी

वैराग, दि. येथे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची जयंती मठामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रसंगी सकाळी आठ वाजता मन्मथ स्वामींचा अभिषेक करण्यात आला. सकाळी दहा वाजता गावातील महिला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता मन्मथ स्वामींचा जन्म उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमास वैराग भागातील विरशैव लिंगायत समाजातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जन्मोत्सवानिमित्त मंदिराला फुलांच्या तोरणांनी सजवण्यात आले होते. मन्मथ स्वामी जन्म उत्सवात प्रसाद वाटप करण्यात आला. संध्याकाळी मानेगाव येथील पुरुष मडंळी भजनांची सेवा पार पाडली. कार्यक्रम पार पाडण्यासाठी गोदावरी घोडके, निता गवसाने, नंदा चिनके, ज्योती हिंगमीरे, कविता सोपल सह महिलांनी परिश्रम घेतले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *