मळेगावात क्रांतीज्योती सावित्रीमाईची जयंती साजरी


मळेगाव (प्रतिनिधी)मळेगाव ता.बार्शी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले .
प्राचीन काळामध्ये समाजात विविध प्रकारच्या प्रथा रूढ होत्या,जसे बाल विवाह , सती प्रथा, केशवपन, या सर्व प्रकाराना स्रियांना सामोरे जावे लागत असे ,त्यामुळे क्रांतिसूर्य महत्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अशा प्रकाराना विरोध केला . जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज्याची स्थापना केली . समाजकार्यामध्ये जोतीबांना सावित्रीमाई फुले खांद्याला खांदा लावून सहकार्य करित . १८७५ मधील दुष्काळग्रस्थ भागातील लोकांसाठी अन्नछत्र चालवुन सत्यशोधक समाज्याने आश्रय दिला, प्लेग च्या साथीमध्ये देखील सावित्रीबाई फुले यांचे कार्य मोलाचे राहिले , म्हणून अशा महान सावित्रीबाई फुलेंचा जन्म दिवस या वर्षी पासून राज्यसरकारने “सावित्री उत्सव दिन ” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच पार्श्वभूमीवर मळेगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्री उत्सव साजरा करण्यात आला .
यावेळी जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक – विठ्ठल कोकरे,दत्तात्रय कुंभार,सावता परिषदेचे युवक अध्यक्ष – अशोक माळी, माळी समाज सेवा संघाचे संपर्क प्रमुख – कल्याण माळी, युवा नेते – नागेश कोळी,पप्पू दीक्षित,अंगणवाडी सेविका – सविता सरवदे,शोभा दीक्षित,आश्विनी दळवी आदी प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *