मळेगाव ग्रामस्थांनी केला बालकलाकार सहयाद्रीचा सत्कार

Malegaon villagers felicitate child artist Sahyadri

वैराग (प्रतिनिधी ) सोशल मीडियाद्वारे लॉकडाऊन काळात कलाकारांची होत असलेली उपासमार पाहून त्यांचा भावना शासनामार्फत पोचवणाऱ्या बालकलाकार सह्याद्री मळेगावकरचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अंकुश माळी यांनी सह्याद्रीस पुस्तक भेट देऊन तिचा सन्मान केला.आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाला कोरोना मुक्तीसाठी घातलेलं साकडं,गणेशोत्सव काळात तसेच येणाऱ्या नवरात्र उत्सवात कलावंतांना कला सादर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना केलेली विनवणी,

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोस्टरच्या व फलकाच्या माध्यमातून केलेली जाणीवजागृती यामुळे सह्याद्री मळेगावकर हिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.तिच्या कार्याची व कलागुणांची दखल घेत सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख तसेच विविध कलावंत,कलाप्रेमी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

बार्शी तालुक्यात शुक्रवारी ११ रोजी आगमन होताच शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर,बार्शी येथील कलाकर मंडळी व मळेगाव ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले.यावेळी अंकुश माळी,क्रांतीनाना मळेगावकर,काकासाहेब गाभणे,नईम शेख,संदीप विटकर,दशरथ इंगोले,बाळासाहेब बडदापुरे,चंद्रकांत उंबरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *