बार्शीच्या लोकमंगल बँकेकडून तालुका व शहर पत्रकारांचा सन्मान

पानगाव (प्रतिनिधी ) पत्रकार दिनाचे औचित्य साधून लोकमंगल बँक शाखा बार्शी यांच्या वतीने तालुका व शहर बातमीदारांचा सन्मान करण्यात आला.प्रारंभी बँकेच्या वतीने डॉ.वंदना यादव यांनी बँकेची भूमिका मांडली.यावेळी बार्शी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे किरण आवारे,आनंदकुमार डूरे,प्रसाद पाटील,बाबासाहेब शिंदे,बलभीम लोखंडे,सागर गरड,संतोष कानगुडे,गणेश अडसूळ,गणेश गोडसे यांच्यासह विविध दैनिकांच्या पत्रकारांचा सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी लोकमंगल बँक शाखा बार्शीच्या शाखा व्यवस्थापक वर्षा शिंदे यांच्यासह सल्लागार दिलीप सुरवसे,जॉन चोप्रा,माधुरी शीलवंत डॉ.वंदना यादव आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन दिलीप सुरवसे यांनी तर आभार प्रसाद पाटील यांनी मानले.

बॅकेच्या सल्लागार डॉ .वंदना यादव यांचे हस्ते सत्कार स्विकारताना दै .सकाळचे बातमीदार संतोष कानगुडे
बॅकेच्या व्यवस्थापिका वर्षा शिंदे यांचे हस्ते सत्कार स्विकारताना दै .पुढारीचे पत्रकार – गणेश गोडसे
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *