वैराग येथे हेल्पलाईनचा शुभारंभ, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपक्रम

वैराग, ( प्रतिनिधी. ) वैराग( ता. बार्शी ) येथे ‘ मा. शरदचंद्रजी पवार साहेब ‘ या नावाने मोफत हेल्पलाईन सुरू झाली. नोंदणी द्वावरे सर्वसामान्यांना घरपोच मदत दिली जात आहे. यासाठी पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट घेत आहेत.

मोफत लसीकरण, घरपोच धान्य, पालेभाज्या, अंत्यसंस्काराचे साहित्य, मोफतअॅब्युलन्स सेवा, शुभ घटनेसाठी लागणारी मदत दिली जात आहे. ”रोहीत पवार युवा ब्रिगेड व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सोलापूर ” यांच्या वतीने राज्यात अशा प्रकारचा चांगला उपक्रम सुरु केला. यामुळे सर्वसामान्यांना फायदा व त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल. असे मत या ऑनलाईन उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महिला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा शलाका मरोड – पाटील, वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जयवंत गुंड, ओम समुहाचे वैजिनाथ आदमाने, विरोधी पक्षनेते अरुण सावंत, वैराग अभियानाचे किशोर देशमुख आदी मान्यवर उपस्थितीत होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *