करमाळा तालुक्यात बिबट्याची दहशत, चार दिवसात घेतला दोघांचा बळी.

करमाळा(प्रतिनिधी)चार-पाच दिवसापासून करमाळा तालुक्यात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये करमाळा तालुक्यात एका तरुण महिलेला जीव गमवावा लागला आहे. ३ डिसेंबर रोजी कल्याण देविदास फुंदे (रा. लिंबेवाडी) तर ५ डिसेंबर रोजी जयश्री दयानंद शिंदे (वय. २६ ) अंजनडोह गावात बिबट्याने महिलेवर हल्ला करून ठार केले आहे. त्यामुळे तालुक्यात घाबरावटीचे वातावरण तयार झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी बीड, सोलापूर व अहमदनगर वनखात्याच्या टीमसह करमाळा पोलीस सज्ज करण्यात आले. तालुक्यातील नागरिकांना पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्याकडून महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

आष्टी व जामखेड तालुक्यातून लिंबेवाडी गावाकडे आला असण्याची शक्यता आहे, कारण आष्टी व परिसरात या बिबट्याने आतापर्यंत सात आठ लोकांवर हल्ला केला असून. लिंबेवाडी येथे हल्ला केलेली व्यक्ती नववी आहे. त्यानंतर अंजनडोह गावात बिबट्याने महिलेवर हल्ला करून ठार केले आहे. हा हल्ला केलेला बिबट्या हा नरभक्षक असण्याची जास्त शक्यता आहे. इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे रक्त वेगळे असते. बिबट्या नरभक्षक असण्याची जास्त शक्यता असल्याने सर्व नागरिकांनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे.

करमाळा तालुक्यातील नदीकाठी व ओढ्याकाठी साधारणपणे झाडाझुडपांचे व बागायती पिकांचे प्रमाण जास्त असल्याने बिबट्या नदी किंवा ओढ्याच्या काठाने प्रवास करतो, तसेच ज्या भागात बागायती पिके आहेत त्या भागात देखील वास्तव्य करतो. त्यामुळे अशा भागातील लोकांनी अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम चालू असून ऊस तोडणीच्या टोळ्या उघड्यावर झोपड्या टाकून राहतात. उजनी जलाशयाच्या काठच्या बागायती भागात बिबट्या शिरल्यास त्याला शोधणे कठीण होईल म्हणून सर्व नागरिकांनी त्याला पकडण्यासाठी आतापासूनच पोलीस व वन खात्याची मदत करणे आवश्यक आहे. ज्या भागात बिबट्या दिसला आहे त्या भागातील लोकांनी तात्काळ पोलिसांना व वनखात्याला कळवावे. असे आव्हान करण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *