जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रॉमा युनिट व आय.सी.सी.यु. युनिटला 25 लाखाची देणगी


बार्शी ( प्रतिनिधी) बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रॉमा युनिट व आय.सी.सी.यु. युनिटला 25 लाख रूपयांच्या देणगीचा धनादेश देण्यात आला आहे .
देणगी दिल्याबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आ .राजेंद्र राऊत यांचा जेष्ठ साहित्यिक व साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष मा. श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
संस्थेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व संस्थेचे माजी विद्यार्थी रणवीर राऊत यांचाही गौरव करून आभार व्यक्त केले . तसेच बाजार समितीचे सर्व संचालक, दि. बार्शी मर्चंट असोसिएशन, व व्यापारी बांधवांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष- डॉ. बी. वाय. यादव, नगराध्यक्ष- ॲड. आसिफभाई तांबोळी, डॉ. प्रकाश बुरगुटे, बाजार समितीचे संचालक- रावसाहेब मनगिरे , यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव- अरूण बारबोले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, बाजार समितीचे सर्व संचालक, व्यापारी बांधव उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *