पिक विमा योजनेतील जाचक अट त्वरीत रद्द करा खा. ओमराजेंची मागणी

मुंगशी प्रतिनिधी ( काशीनाथ क्षीरसागर ) पंतप्रधान पिक विमा योजनेत असणारी शेतकर्‍यांनी वैयक्तीक पोर्टलवर ७२ तासात तक्रार करावी, ही अट या योजनेतून कायमची रद्द करावी, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्याकडे नुकतीच केली आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील वीजेची व्यवस्था कोलमडली  होती. त्यामुळे या शेती क्षेत्रात झालेल्या नुकसानीची माहिती शेतकरी वीज नसल्याने, स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा बंद पडल्यामुळे विमा पोर्टलवर नोंदवू शकले नाहीत.  ही अट पंतप्रधान विमा योजनेतील शेतकर्‍यांसाठी जाचक व अन्याय करणारी असुन या अटीमुळे लाखो शेतकरी पीक विमा मिळण्यापासुन वंचित राहिले आहेत. ही अट केवळ विमा कंपनीसाठी फायद्याची आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी व त्यांच्या यंत्रणेमार्फत सादर केलेले अहवाल स्वीकारून विमा कंपनीने शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची व विम्याची भरपाई शेतकर्‍यांना देणे आवश्यक आहे.  त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसान झालेल्या शेती क्षेत्राची तक्रार वैयक्तिक शेतकर्‍यांनी विमा पोर्टलवर भरणे ही अट शेतकर्‍यांसाठी अत्यंत अन्यायकारक व जाचक असल्याने ही अट कायमची या योजनेतुन रद्द करावी व असे आदेश पंतप्रधान पीक वीमा योजनेत सहभाग घेणार्‍या सर्व वीमा कंपन्यांना निर्गमीत करावेत, व शेतकर्‍यांना विम्याची रक्कम त्वरीत मिळणेबाबत आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *