वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सन्मानास पात्र गावांचा मुख्यमंत्री व अमीर खान यांच्या उपस्थितीत आज सम्मान

बार्शी (प्रतिनिधी) समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 गावांचा मुख्यमंत्री आणि अमीरखान यांच्या उपस्थितित आज २२ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता ऑनलाइन सन्मान होत आहे . सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत अतिशय कष्ट घेत पाणीदार झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास ९०० गावांसाठी पानी फाउंडेशनने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा सुरू केली होती .ज्या गावांनी चांगले काम केले आहे , अशा गावांचा सन्मान मुख्यमंत्री – उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पध्दतीने होत आहे .

1) इर्ले 2)सुर्डी 3)रस्तापुर 4)चिंचोली
5)मांडेगाव 6)खड़कोणी 7)चुंब 8)मुंगशी(वा) 9)मुंगशी(आर) 10)अरणगाव ह्या
बार्शी तालुक्यातील 10 गावांचा मुख्यमंत्री आणि अमीरखान यांच्या उपस्थितित ऑनलाइन सन्मान होत आहे .

बार्शी तालुक्यातील १४ गावा पैकि १० गावे १२० पैकी ७० गुण मिळवून पहिल्या टप्यात सन्मानास पात्र ठरली . एकूण ५०० गुणांच्या स्पर्धेत ४ -५ टप्पे पुढे होतील . यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण न घेता ऑनलाइन पद्धतीने हजारो जलयोद्ध्यांनी हे प्रशिक्षण गावपातळीवर पूर्ण केले .
अनेक गावांत नेटवर्क मिळत नव्हते तरी काही ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या टाकीवर , तर टेकडीवर प्रशिक्षण घेतले. चांगले नेटवर्कमुळे एका गावामध्ये बसथांबाच प्रशिक्षण केंद्र बनला. जेंव्हा जोराचा पाऊस आला तेव्हा लॅपटॉपवर छत्री धरून काहिंनी प्रशिक्षण पूर्ण केले .

ही आहे बार्शी तालुक्यातील सुर्डीच्या माळावरील भरलेली विहीर


पाणीदार गाव करणेसाठी तरुणाई पुढे आली, कुठे बचत गटाच्या महिला पुढे आल्या, तर कुठे वडीलधारी माणसं . अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या कामात हिरीरिने उतरले. तसेच प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी या कामास मोठी साथ दिली . आजचा सन्मान सोहळा पानी फाउंडेशनच्या फेसबूक पेजवर https://www.facebook.com/paanifoundation
तसेच पानी फाउंडेशनच्या युट्युब लिंकवर https://www.youtube.com/paanifoundation पाहू शकता .
सन २०१९ मध्ये राज्यात सुर्डी गावाने पहिला नंबर पटकावला होता . त्यावेळी तालुक्यात चिंचोली – प्रथम , अरणगाव व्दितीय तर खडकोणी चा तृतीय क्रमांक आला होता . तसेच २०१८ मध्ये चुंब – प्रथम , खडकोणी व्दितीय तर राळेरास चा तृतीय क्रमांक होता .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *