हळदुगे येथिल वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


वैराग (प्रतिनिधी)हळदुगे ताः बार्शी येथे १९डिसेंबर सकाळी ९ वा.सुमारास गावातील ६५ वर्षीय वृध्देस ट्रॅकटरने समोरून धडक दिल्याने उपचारादरम्यान तिचा २१ रोजी मृत्यू झाला . मृत्यूस कारणीभुत ट्रक्टर चालकाविरुद्ध ३० डिसेंबर रोजी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की ,१९डिसेंबर सकाळी ९ वा.सुमारास जया प्रल्हाद सुर्यवंशी (वय- 65 वर्ष ) रा. हळदुगे ता. बार्शी कामानिमीत्त घराकडून एस.टी. स्टॅन्डकडे रोडवरून पायी चालत निघाल्या होत्या . दरम्यान ट्रॅक्टर चालक लक्ष्मण निवृत्ती जगताप रा. हळदुगे ता. बार्शी याने त्याच्या ताब्यातील ट्रक्टरने जया सुर्यवंशी हीस समोरून जोराची धडक दिली . प्रथम त्यांना सिव्हिल हॉस्पीटल उस्मानाबाद येथे व नंतर सिव्हिल हॉस्पीटल सोलापूर येथे उपचारकरिता दाखल करुन पुढील उपचार चालू असताना 21रोजी सकाळी 10:30 वा.सुमारास त्यांचे निधन झाले .
ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगाने हयगईने व निष्काळजी पणे ट्रॅक्टर चालवुन , वृद्धेस गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरला आहे .
मयत महिलेच्या बहिणीचा मुलगा – लहू साहेबराव कांबळे (वय-42) रा.रुई ता. बार्शी यांनी ट्रॅक्टर चालक लक्ष्मण निवृत्ती जगताप यांचे विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दीली आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *