नंदुमहाराज रणशुर यांना ” ज्ञानदीप जीवन गौरव पुरस्कार “

पुणे -कोल्हापूर येथील श्री हरी गंगा प्रतिष्ठान द्वारा वैराग येथील ह.भ.प नंदुमहाराज रणशुर यांना ज्ञानदीप जीवन गौरव पुरस्कार   विठ्ठल – रुक्मिणी मंदिर वैराग येथे सोमवार दि.२२ रोजीह.भ.प बळीराम काक साठे  राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर यांच्या शुभहस्ते देण्यात आला .
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुवीर कुलकर्णी व मान्यवरांनी  ह.भ.प .नंदू महाराज रणशुर यांनी वारकरी संप्रदाय व भागवत धर्माच्या केलेल्या कार्याची प्रशंसा  आपल्या भाषणातून व्यक्त केली .
यावेळी प्रमुख पाहुणे  प्रदेश मंत्री विश्व हिंदू परिषद मुंबई चे – सतीश आरगडे काळेगावचे सरपंच -आप्पासाहेब घायतिडक ,वैराग व  भागातील सर्व स्त्री – पुरुष भजनी मंडळी , महराज मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते .      
     यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – दत्ता मोकाशी सर यांनी केले आणि आभार महादेव बोधले महाराज यांनी मानले . पसायदान व महाप्रसाद होऊन  कार्यक्रम संपन्न झाला .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *