सासुरे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करून महामानवाला अभिवादन


वैराग (प्रतिनिधी ) सासुरे ता.बार्शी येथे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर आंची 130 वी जयंती भीमरत्न बहुउदेशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सामुदायिक वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले तसेच सर्वाना पेढे वाटून आंनद साजरा करण्यात आला .

मंडळाने सामाजिक भान ठेवून भीमरत्न ग्रुप व आर पी आय .(आ) यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजन केले होते . या रक्तदान शिबीराचे उद्‌घाटन वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक -विनय बहिर यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी गावातील भीम अनुयायी तसेच शिव प्रेमी तरुणांनी सहभाग घेत 51 जणांनी रक्तदान केले . या सामाजिक उपक्रमाचे पोलीस निरीक्षक – विनय बहिर यांनी कौतुक केले .


या वेळी सासुरेचे सरपंच – तात्यासाहेब करंडे , स्वाभिमानी परिवाराचे – गणेश करंडे ,माजी मेंबर सज्जन करंडे,ग्रामपंचायत सदस्य – रामभाऊ आवारे , माजी सरपंच -विकास पाटील , दीपक पाटील , तानाजी धडे , आर पी आय.बार्शी तालुकाध्यक्ष – दत्ता क्षीरसागर , आर पी आय वैराग ब्लॉक अध्यक्ष – विकास बनसोडे ,आर पी आय तालुका महिला उपाध्यक्ष सौ.जयश्री कांबळे , आर पी आय तालुका युवक सरचिटणीस- रविराज बनसोडे ग्रा. सदस्य -जीवन लोंढे , सामाजिक कार्यकर्ते श्रावण किरर्तकरवे ,अशोक सावंत, मारुती कावरे,बापू धीमधीमे , चंद्रकांत डांगे ,मारुती डांगे ,लखन कावरे , रामचंद्र भोसले ,सज्जन चौधरी , नितीन धडे , दत्ता गडकर , विकास तुपेरे ,सचिन करंडे ,आनंद करंडे , शिवाजी डोलारे , हेमंत करंडे ,बाजीराव करंडे , अतुल शिडोळे ,लखन कांबळे , विकास गायकवाड , प्रदीप गायकवाड , सुनील कावरे ,अजय बनसोडे ,दादा डांगे , सर्जेराव धीमधीमे , आदीसह आंबेडकर प्रेमी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *