गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय संस्थेकडून डॉ.आंबेडकर यांना अभिवादन

बार्शी |  विश्वभूषण, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल मंगळवारी गुळपोळी येथिल महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून साध्या पध्दतीने व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत साजरी करण्यात आली .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय बावणे तर प्रमुख पाहुणे मेजर रामचंद्र माळी हे होते.
महामानव डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला -मेजर रामचंद्र माळी यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांच्या हस्ते विविध मान्यवरांचे पुस्तक व गुलाब देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष – भैरवनाथ चौधरी यांनी केली तर सूत्रसंचालन व आभार – किरण खुरंगळे यांनी मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, गणेश लंगोटे , मंगेश डोळसे , सुरज चौधरी , धनंजय बावणे , रामचंद्र काळे इतर मान्यवर संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *