बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

.मुंगशी सह परिसरात अवळाकी पावसाने ज्वारीचे पिक जमिनदोस्त झालेचे दिसत आहे

मुंगशी प्रतिनिधी ( काशीनाथ क्षीरसागर )

मुंगशी ( वा. ) ता. बार्शी व परिसरात १८ रोजी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थीक संकटात सापडला आहे

परिसरातील प्रामुख्याने ज्वारी ,गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचबरोबर द्राक्ष पिकाला ही फटका बसला आहे .ज्वारीचे पीक तर अक्षरशा शेतामध्ये झोपून गेले आहे , गतवर्षी झालेल्या अति पावसाने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडून गेले होते . त्यातच हा अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी मोठा हतबल झालेला दिसत आहे . हातातोंडाशी आलेला घास आपल्या डोळ्यादेखत त्याचे नुकसान शेतकरी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे . गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे शेतकरी बिकट परिस्थितीतून आपला प्रपंच गाडा चालवीत होता गेल्या वर्षीच्या पावसाने ही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी देखील शासनाने पीक विम्याची रक्कम अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली नाही . त्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडलेला आहे . तरी शासनाने अवकाळी पावसाची दखल घेऊन झालेल्या ज्वारी , गहू, हरभरा व द्राक्षे पिकांचे नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी आता परिसरातील शेतकरी करीत आहेत.

अवळाकी पावसाने पिंपरी (सा) येथिल राजेंद्र काशीद यांच्या ज्वारीचे पिक जमिनदोस्त झालेचे दिसत आहे

अवकाळीने वैराग परिसरातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले

बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा),हिंगणी,उपळे,नांदनी,घाणेगाव,बावी,ढाळे पिंपळगाव,मळेगाव,जामगाव,महागाव परिसरात पहाटे तीन वाजता मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे द्राक्ष,ऊस,मका,गहू,हरभरा,ज्वारी,कांदा, खरबूज,कलिंगड पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. भविष्यात कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.अवकाळी पावसात ज्वारी भुईसपाट झाली.विक्रीला आलेली द्राक्ष पावसात खराब झाली.काढून पडलेला कांदा मातीमोल झाला आहे. निसर्गाच्या लहरी पावसामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

गौडगावचे शेतकरी अमोल यादव यांच्या ज्वारीचे पावसाने मोठे नुकसान झाले
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *