बार्शी आगारात मोफत नेत्र तपासणी शिबीर

नेत्र तपासणी करताना नेत्र रोग तज्ञ डॉ. अमर खेंदाड

प्रतिनिधी : ( काशीनाथ क्षिरसागर )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बार्शी आगार व श्री डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी आगार येथे दिनांक 18 फेब्रुवारी, गुरुवारी अपघात सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने चालक, वाहक तसेच एस.टी कर्मचारी व अधिकारी यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

नेत्र तपासणी साठी नेत्र रोग तज्ञ डॉ. अमर खेंदाड व नेत्र चिकित्सक – स्वप्नील उबाळे यांनी नेत्र तपासणी केली. या शिबिराच्या आयोजनासाठी आगार व्यवस्थापक – मोहन वाकळे, बस स्थानक प्रमुख -स्मिता मिसाळ, विजय बुटे, महेंद्र क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले. या नेत्र शिबिराचा शंभर हुन अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला.हे शिबीर बार्शी बस स्थानक मध्ये घेण्यात आले. तिथे चालक , वाहक आणि ईतर कर्मचाऱ्यांना नियमित नेत्र तपासणीचे महत्व व गरज याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *