सिनेच्या महापुराने नवभारत शाळेच्या वर्गखोल्या जमीनदोस्त

इयत्ता सहावीचा वर्ग
इयत्ता सातवीचा वर्ग

दारफळ (सिना) / विजय शिंदे :  माढा तालुक्यातील दारफळ सिना येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, नवभारत विद्यालय दारफळ ही शाळा सीना नदीच्या काठावर असून गेली ५२ वर्षे सातत्याने यशाची उज्वल परंपरा सांभाळत आहे. ग्रामीण भागातील एक आदर्श शाळा म्हणून तालुक्यात तसेच जिल्ह्यात नामांकित आहे. १७ ऑक्टोबर रोजी सिना नदीला आलेल्या महापूरा मुळे शाळेच्या दोन वर्ग खोल्यांची पाठ भिंत कोसळून शाळेच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अंदाजे दोन लाख रू.पर्यंत नुकसान झाल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. पडलेल्या वर्गामध्ये इयत्ता सहावी व सातवीचे वर्ग भरत होते. त्यामुळे जर काही दिवसांंनी शाळा सुरु झाल्यास विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

नवभारत विद्यालय दारफळ ही शाळा जिल्ह्यात आदर्श  शाळा असून या विद्यालयातील अनेक विद्यार्थी देशाच्या प्रत्येक क्षेत्रात वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. चालु वर्षी कोरोना या महामारी रोगामुळे शाळा जरी बंद असल्या तरी नवभारत विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पाचवी ते दहावी पर्यंत ऑनलाईन अभ्यासक्रम नियमितपणे चालु आहेत. प्रशालेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळाने पडलेल्या भिंतीचा पंचनाम्याचा प्रस्ताव दारफळचे ग्रामसेवक समाधान जाधव व तलाठी ढवण यांच्याकडे देण्यात आला आहे. पडलेल्या वर्ग शासनाने लवकरात लवकर बांधून देवून वर्ग पुर्वस्थितीत चालू करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थ व पालक वर्गातून होत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *