इंधन निर्मिती प्रकल्प देणार शेतक-यांना उभारी : डॉ. खपाले


पंढरपूर I प्रतिनिधि एमसीएलच्या माध्यमातून उभारण्यात येणारा गवतापासून जैविक इंधन व सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प पंढरपूर तालुक्यातील शेतक-यांना उभारी देण्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार असून यामुळे रोजगार निर्मिती तर होईलच परंतु शेतक-यांचे जीवनमान उंचविण्यासाठीही मदत होणार असल्याचे प्रतिपादन डॉ .हनुमंत खपाले यांनी केले.


पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथे अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर एमसीएल कंपनी अंतर्गत नंदादीप बायोफ्युएल्स प्र.लि. या प्रकल्पाचे भुमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी डॉ .हनुमंत खपाले बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी ग्रमद्योजक दिग्वीजय बाजारे, रहीम पटवेगीरी, महादेव गायकवाड, नानासाहेब देवकर, विष्णु व्यवहारे, निखील शिंदे, तात्यासाहेब गायकवाड, कंपनी प्रितनिधी किशोर सोनवले आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना, डॉ .खपाले यांनी सांगितले कि, कंपनीचे संस्थापक भिमराव कोंडुभैरे व मार्गदर्शक नानासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत असलेल्या या प्रकल्पामध्ये सुपर नेपीयर या गवताच्या विकसीत वाणापासुन इंधन व सेंद्रीय खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचे बियाणे कंपनी पुरविणार आहे. तर हे उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांना फारसे कष्ट व खते लागत नाहीत. हे गवत कंपनी शेतक-यांकडुन विकत घेणार असून त्यापासुन इंधन निर्मिती करणार आहे. यामुळे शेतक-यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून त्यांचे अर्थिक जीवनमान उंचविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी दिग्वीजय बाजारे, कंपनी प्रितनिधी किशोर सोनवले यांनीही या प्रकल्पाबाबत माहिती देवून शेतक-यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी शपथ वाचन करून वृक्षारोपणही करण्यात आले. तर कार्यक्रमाप्रसंगी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *