पिकविमा मीळवून दिल्याबद्दल शेतकरी नेत्याचा कपड्यांचा आहेर देवून सन्मान

शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचा सत्कार करताना उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ.

बार्शी(प्रतिनिधी)
गेल्या सुमारे बारा वर्षापासून शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून देणारे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी राज्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा पिकविमा मिळवून दिल्याबद्दल शिराळे ता.बार्शी येथिल शेतकऱ्यांनी अकरा हजार रुपये व कपड्यांचा आहेर करून जाहीर सत्कार केला.

राज्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलन…गायकवाड


सत्कारप्रसंगी गायकवाड म्हणाले की, अजूनही राज्यातील अनेक शेतकरी विमा भरपाई पासून वंचीत असल्याचे फोन येत आहेत , त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांना भरपाई जमा करण्यास भाग पाडावे अन्यथा सोहळा जून पासून संबंधित सर्व राज्यस्तरिय कार्यालयासह विमा कंपनीच्या मालकाच्या घरावरही आंदोलने केली जातील असा खणखणीत इशाराही शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला .
यावेळी दयानंद चौधरी, गोटू पाटील, अरविंद चौधरी, बजिरंग चौधरी, नितीन कदम, बाजीराव चौधरी, श्रीहरी गायकवाड, सिध्दार्थ चौधरी, समाधान पाटील, अक्षय मते, सुरज चौधरी, सुरेश चौधरी, विठ्ठल पाटील, मधूकर चौधरी, निलेश चौधरी, नृसिंग अंकुशे, बालाजी चौधरी, राजेंद्र फरताडे, अनिल सावंत, आबा तानवडे आदींसह पंचक्रोशितील शेतकरी उपस्थित होते.


Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *