हळवा कवी

कवी फार हळवा असतो
आपल्या लेखणीच्या जोरावर
रक्तहिन क्रांतीची मशाल
समाजमनात तेवत ठेवतो

कवी फार हळवा असतो
साऱ्या जगावर प्रेम करतो
एखाद्याचा प्रेमभंग पाहून
फक्त विरही कविता लिहतो

कवी फार हळवा असतो
फारसा मोहात गुंतत नसतो
धनसंपत्तीच्या मागे न लागता
आपल्या भावविश्वात रमत असतो

कवी फार हळवा असतो
पण , पिडीतावरील अन्याय पाहून
तो नखशिखांत पेटून उठतो
आपल्या शब्द शस्राने घाव घालतो

कवी फार हळवा असतो
तो उत्तम चित्रकारही असतो
समाज व निसर्गचे बहुरंगी चित्र
आपल्या शब्द कुंचल्यातून रंगवतो

कवी फार हळवा असतो
आपल्या प्रतिभेला हळुवार जपत
आपल्या भावनांच्या शाब्दीक फुलांना
हृदयाच्या परडीत साठवत असतो

श्री. हेमंत ज. रत्नपारखी
मंगळवेढा ९८२२२३३३९५

हेमंत रत्नपारखी

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *