अधिस्विकृतीधारका प्रमाणे डिजिटल मिडियातील संपादक व पत्रकारांना संचारबंदीतून वगळावे – राजा माने

संस्थापक अध्यक्ष – डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र


वैराग (प्रतिनिधी ) राज्यातील डिजिटल मिडियातील संपादक व पत्रकारांना संचारबंदी निर्बंध नियमातून वगळून संरक्षण देण्याची मागणी जेष्ठ पत्रकार तथा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष -राजा माने
यांनी १४ एप्रिल रोजी निवेदनाव्दारे राज्याचे मुख्यमंत्री – उथ्दवजी ठाकरे यांचेकडे केली आहे .

डिजिटल मिडियाचा सध्या गाव पातळीपर्यंत पोहोचलेला आहे .कोविड महामारी सारख्या संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या कार्यास पूरक असे काम महाराष्ट्र डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना करीत आहे.राज्यात प्रशासन आणि जनता यांच्यातील विधायक व सकारात्मक संवादातील महत्त्वाचा दुवा म्हणून न्यूज पोर्टल्स, न्यूज यू ट्यूब चैनल्स, न्यूज वेबसाईटस् आणि विविध ऑनलाइन आवृत्त्यांचे संपादक, वार्ताहर, फोटो व व्हिडीओ ग्राफर्स करीत आहेत.
कोविड महामारीची साखळी तोडण्यासाठी आपण राज्यात जाहीर केलेल्या संचारबंदीचे आम्ही स्वागत करतो.या कालावधीत आपण केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच संचारबंदी निर्बंधमुक्त केले. डिजिटल मिडिया अधिस्वीकृती संदर्भात केंद्र व राज्य शासनाने अद्याप कुठलीही यंत्रणा अथवा मान्यता पध्दती विकसित केलेली नाही. त्यामुळे संचारबंदी काळात डिजिटल मिडियात कर्तव्य बजावणाऱ्यांची गैरसोय होत आहे .तरी राज्यातील डिजिटल मिडियातील संपादक आणि सर्व पत्रकारिता घटकांना संचारबंदी निर्बंधातून सूट द्यावी व तशा सूचना गावपातळीवर निर्गमित कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे . या मागणीला डिजिटल मिडियातील सर्व घटकांचा पाठिंबा वाढताना दिसत आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *