कोरोनामुळे शेतकरी संघटनेने पुढे ढकलले आंदोलन

.विविध संबंधित अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शिष्ठमंडळ.

बार्शी(प्रतिनिधी)
पिकविमा, अतिवृष्टी व मागील दुष्काळ निधी राहिलेल्या शेतकऱ्यांना द्या, ग्रामीण भागातील खराब रस्ते नव्याने डांबरीकरण करा, उजनी कॕनॉलचे पाणी पुर्वीच्या सर्व्हे नुसार ओपन पध्दतीने पाथरी, ममदापूर, गोरमाळे तलावात सोडा, विद्युत कनेक्शन तोडणे बंद करा आदी मागण्यांसाठी बार्शी ते लातूर रस्त्यावरील पांगरी येथे आज ठरल्याप्रमाणे रस्ता रोको करण्यासाठी लोक जमा झाले परंतु पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधिर तोरडमल, तहसीलचे प्रतिनिधी विशाल नलवडे, जि.प.बांधकाम शाखा अभियंता जुबेर शेख आदींनी कोरोनाच्या संदर्भात वरिष्ठांनी दिलेले आदेश दाखवून आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली व त्या विनंतीला मान देत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व शिष्ठमंडळासोबत पांगरी पोलीस ठाण्यात विविध आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा घडवून आणण्यात आली. यावेळी शंकर गायकवाड यांनी मागण्यांची पुर्तता लवकरच न झाल्यास पुन्हा ८ मार्च रोजी ठरल्याप्रमाणे रस्ता रोको किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कोंडून फटके मारण्याचे आंदोलन करणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले, त्यावेळी शेतकरी संघटनेचे बार्शी तालुका युवा अध्यक्ष शरद भालेकर, सचिन आगलावे, रामराव काटे, स्वप्निल पवार, बाळकृष्ण काकडे, पांगरीचे माजी सरपंच औदुंबर काकडे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *