रातंजन येथे मानवता संस्थेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

वैराग | बार्शी तालुक्यातील रातंजन येथे विश्वभूषण, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां ची १३० वी जयंती मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून उत्साहात पण कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली .

  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच -रंजना  तिसरबुडे , तर अध्यक्ष - बापू नागटिळक होते. प्रमुख उपस्थिती - उर्मिला देशमुख , परमेश्वर बिले, किसन हजारे , महादेव काटकर होते.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार रंजना तिसरबुडे , बापू नागटिळक यांच्या हस्ते घालण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष -अशोक नागटिळक यांच्या हस्ते विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रस्तावना मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष -गौतम नागटिळक यांनी केली .सूत्रसंचालन व आभार बिरु नागटिळक यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष – अशोक नागटिळक , अतुल तिसरबुडे, अर्जुन नागटिळक ,भाऊसाहेब पांडागळे ,सिद्राम तिसरबूडे , बाळू नागटिळक , धनंजय हजारे , विकास तिसरबुडे, संदीपान सुरवसे , काका पाटील , श्रीपाल डोळसे , किसन हजारे इतर मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *