शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद – प्रभाकर झोड

सोलापूर : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद ही शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना आहे, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणी निवडीप्रसंगी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर झोड यांनी केले.
निवडीचा कार्यक्रम मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक परिषदेचे प्रदेक्षाध्यक्ष प्रभाकर झोड तर प्रदेश कार्याध्यक्ष धनंजय उज्जनकर, प्रदेश समन्वयक उच्च माध्यमिक प्रभाकर भोरे, प्रदेश संपर्क प्रमुख अंबादास रेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिक्षक परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

लक्ष्मण महाडिक (जिल्हा प्रवक्ता), दत्तात्रेय मस्के (जिल्हा कोषाध्यक्ष), संजीवकुमार आळगी (जिल्हा संघटक), दिपक शिंदे (जिल्हा उपाध्यक्ष), लक्ष्मण जाधव (शहराध्यक्ष), गंगाधर डोके (दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष), भारत पाटील (पंढरपूर तालुकाध्यक्ष), विश्वास पाटील (सांगोला तालुकाध्यक्ष), शुभांगी निंबाळकर (शहर महिला आघाडी प्रमुख), भोसले मॅडम (सह महिला आघडीप्रामुख) तर सुरवसे सर (सचिव, दक्षिण सोलापूर) यांना नियुक्ती पत्र देण्यात येऊन निवड करण्यात आले. नूतन पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले.
यावेळी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष संजय जाधव, तानाजी चटके, समन्वयक दत्ता (मामा) मुळे, शहराध्यक्ष सदाशिव पवार, उद्योजक आकाश फाटे, सतिश क्षीरसागर, प्रभाकर शिंदे, महासिद्ध देशमुख, सतिश जकुने, संतोष हिरेमठ, भूताळी गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष जीवन यादव, सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक तर आभार हणमंत पवार यांनी मानले.

डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे नूतन पदाधिकारी

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *