साकत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


साकतः बार्शी तालुक्यातील साकत येथे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती बुध्दभुषण बहुद्देशीय संस्थेकडून साजरी करण्यात आली . यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाहीर राजेश ननवरे (बावीकर ) यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी संस्थेचे सचिव स्वाती सोनवणे , उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, गावकामगार पोलिस पाटील भाऊसाहेब पाटील, इरफान शेख, ग्रामपंचायत सदस्य अमोल ओहोळ, जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश मोरे, अक्षय विद्याधर आदी मान्यवर उपस्थित होते . तसेच आभार संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ सोनवणे यांनी मानले
.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *