नोकरदारांच्या धानोरे ची बागायतदारांचे गाव म्हणून होतेय नविन ओळख

वैराग/प्रणित देशमुख – धानोरे (देवी) ता. माढा या माढा, बार्शी आणि मोहोळ या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या गावची ओळख नोकरदाराचे गाव अशी आहे कारण प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती तरी नोकरदार आहे.पण आता पाण्याचा कायमस्वरूपी विश्वासू स्त्रोत नसतानाही प्रत्येक शेतकऱ्याची थोडी तरी द्राक्ष बाग आहे.त्यामुळे प्रत्येकाचे शेतीवरचे उत्पन्न आता लाखोंच्या पुढे असून धानोरे गावाची ओळखच बागायतदाराचे गाव अशी होत आहे.
गावाजवळून कोणती नदी तर सोडा साधा मोठा ओढा पण जात नसताना मागील काही वर्षात पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून भरपूर जलसंधारणाचे काम गावातील सर्वांनी केले असून त्यामधून शेततळी व विहीर, बोअर चे पाणी सूक्ष्म सिंचन वापरून द्राक्षेची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

द्राक्षेच्या जोडीला आता शेतकरी आंबा,तसेच शिताफळ,पेरू या फळांच्या बागेकडे पण वळताना दिसत आहेत.
परिणामी शेकडो एकर क्षेत्र आता फळबागेने फुलून गेलेले पहावयास मिळत आहे ज्यामुळे गावाची एक नवीन ओळख तयार होत आहे.
बहुतांश देशमुख संख्या असलेल्या गावात कोणताही घोषा न पाळता स्त्री – पुरुष खांद्याला खांदा लाऊन कष्ट करतात. त्यामुळे गावात चांगली सुबत्ता नांदत आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *