पंढरपुरात धनगर समाजाचे ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

पंढरपूर (प्रतिनिधी ) धनगर समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी धनगर समाजाचे ढोल बजाओ , सरकार जगाओ आंदोलन आ . गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे शुक्रवारी चंद्रभागेच्या वाळवंटात समाजाच्या कार्यकर्त्यासह करण्यात आले.
यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले की – संविधानाने आम्हांला जे दिलय ते दया . धनगर समाजाच्या एसटी च्या आरक्षणाची आमची प्रमुख मागणी आहे .राज्यभरातील धनगर समाजाच्या तज्ञ , राजकिय जेष्ठ लोकांची बैठक घेवून राज्य सरकारने मार्ग काढावा , पुर्वीचा धनगड व धनगर हा संभ्रम आता राहीला नाही . २०२१ मध्ये धनगरांची जनगणना करून त्यानुसार राजकिय व शैक्षणिक आरक्षण दया . अन्यथा राज्यभर सत्ताधारी आमदार व मंत्र्यांच्या दारात आंदोलन करू .धनगर आरक्षणाचा सरकारने अध्यादेश काढुन ते चालु करावं व तसे केंद्र शासनाला कळवावे . अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली.यावेळी मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *