आगळगाव येथे नायब तहसिलदारांनी घेतला कोरोना आढावा

बार्शी । प्रतिनिधी बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे कोरोना आढावा बैठक विठ्ठल मंदिरामध्ये नायब तहसिलदार संजिवन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
यावेळी आगळगाव येथे नव्याने स्थापन केलेल्या कोविड सेंटरचा आढावा घेवून तेथील अडीअडची जाणून घेतल्या तसेच गावातील कुपोषित बालकांची सद्यस्थिती जाणून घेवून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. 
     गाव कोरोना मुक्त कसे होईल याबाबत सरपंच ,ग्रामसेवक, सदस्यांची मते जाणून घेवून गाव कोरोना मुक्त करण्याचे अवाहन मुंढे यांनी केले. तसेच किराणा दुकानातिल माल चढया भावाने विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करणार असल्याचे यावेळी मुंडे यांनी सांगितले.
     यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी जाधव यांनी धनगरवाडी येथे मुरुम उचलणाऱ्यावर कारवाई करावी असे निवेदन नायब तहसिलदार संजिवन मुंढे यांना दिले
यावेळी नायब तहसीलदार संजिवण मुंडे, सरपंच सौ पुतळा गरड, उपसरपंच वैभव उकिरडे, ग्रामसेवक तात्यासाहेब साठे, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष शरद उकिरडे, माजी सरपंच सुरज आगळे, सर्कल भगवान मुंडे, तलाठी हरिदास ताले, पोलिस हेडकॉन्सटेबल राजेंद्र मंगरूळे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी जाधव, सचिन खटके, बन्सीलाल मुजावर, सचिन किरतकुडवे, अजय विधाते, दिलीप डमरे, विकास उकिरडे, कुमार लंगोटे, महेश आगळे व अंगनवाडी सेविका उपस्थित होत्या.
Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *