कुडाळ च्या आंबेडकर नगरातील समाज मंदिराचे नगरसेविका जाधव यांच्या हस्ते लोकार्पण

कुडाळ (प्रतिनिधी )
कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील समाज मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले आहे . असून भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने समाज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले . याचे उद्घाटन प्रभागाच्या नगरसेविका सौ. सरोज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिराचे लोकार्पण करताना नगरसेविका सौ सरोज जाधव आदी मान्यवर

कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे ग्रामपंचायत कालावधीमध्ये बांधलेल्या समाज मंदिराची दुरवस्था झाली होती . हे समाज मंदिर अनेक सामाजिक उपक्रमांसाठी उपयोगात येत होते. ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील वस्तीला पुराचा तडाखा बसत असे त्यावेळी पूरग्रस्तांना राहण्याची व्यवस्था या समाज मंदिरामध्ये केली जात होती , मात्र दुरवस्था झाल्यामुळे ते गैरसोईचे बनले होते . यासंदर्भात तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दुरुस्तीसाठी निधी देण्याचे कबूल केले ,मात्र या समाज मंदिरासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नाही .येथिल नागरिकांच्या नगरपंचायतीकडे वारंवार मागणीमुळे कुडाळ नगरपंचायतीने समाज मंदिराच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला . यासाठी प्रभागाच्या नगरसेविका सौ. सरोज जाधव यांनी प्रयत्न केले .
दुरुस्त केलेल्या समाज मंदिराचे लोकार्पण नगरसेविका सौ. सरोज जाधव यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून कोरोना महामारीचे नियम पाळून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले . यावेळी जय भीम युवक मंडळाचे माजी अध्यक्ष व्ही. डी. जाधव, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण कुडाळकर, भारतीय बौद्ध महासभेचे शंकर कदम, आर. डी. चेंदवणकर, नाना नेरुरकर, नागरिकांमध्ये आत्माराम जाधव, विलास कुडाळकर, रजनीकांत कदम, जीवन कुडाळकर, राजेश कुडाळकर, किशोर कुडाळकर, यशवंत कुडाळकर, संतोष कुडाळकर, उदय कदम, प्रवीण कुडाळकर, देवदास जाधव, सुंदर तेंडोलकर तसेच आदी नागरिक उपस्थित होते.
यावेळी समाज मंदिराला नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, स्वीकृत नगरसेवक राकेश कांदे तसेच सौ रेवती राणे, सौ. ममता धुरी, सौ. आदिती सावंत, राजवीर पाटील यांनी भेट दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *