पिंपरीत शिवजयंती निमित्त हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन ,रक्तदान शिबिरात ४० जणांचे रक्तदान-

बार्शी तालुक्यातील पिंपरी (आर ) येथील युवकांनी शिवजयंतीच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडवुन एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.शिवप्रेमी प्रतिष्ठान व श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार (दि. २२) रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर रक्तदान शिबिरात पिंपरी (आर) येथील हिंदू व मुस्लिम युवकांनी एकत्रित शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यात ४० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.गावातील युवकांनी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी टाकलेलं पाऊल खरच कौतुकास्पद आहे.या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.यावेळी अनिकेत लंगोटे,गणेश लंगोटे
फकीर शेख,उस्मान डोंगरे,बाळु पठाण,निखिल गोफण,प्रतिक पाटील,बहादुर पठाण,नागेश सातपुते,अविनाश गांधले
आदर्श गांधले,अभिजित पाटील,अमिर शेख,परमेश्वर पाटील,अशोक गोफण,समाधान कदम,संतोष जाधव,रवी जाधव,अक्षय जाधव,अक्षय पाटील उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *