दारफळ व सिना नदीकाटचे नुकसानिचे पंचनामे करा : रणजितसिंह शिंदे

दारफळ (विजय शिंदे)  : माढा तालुक्यातील सिना नदीला आलेल्या महापूरामुळे दारफळ व सिना नदी परिसरातील भागाचे फार नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागाची पाहणी मानेगाव जि.प.मतदार संघाचे सदस्य- रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी केली.

पुरग्रस्त भागाची पाहणी करताना जि. प. सदस्य मा. रणजितसिंह बबनराव शिंदे व दारफळ ग्रामस्त

    माढा तालुक्यातील खैराव, मानेगाव, जामगाव, केवड, वाकाव, उंदरगाव, गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने  सिना नदी,घोरवडा , बेंदवड्याला प्रचंड पाणी आल्याने शेतातील उभ्या पिकांचे, फळबागेचं,घरांची पडझड, विद्युत पुरवठ्याच्या डेपो, पोल, तसेच बंधारे, रस्त्याचे, व शेतक-याच्या केबल, मोटारी, स्टाटर,शेततळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . नुकसानग्रस्त  भागाची पाहणी करुन रणजितसिंह  शिंदे यांनी  अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत असे प्रशासनाला सांगितले.

   यावेळी आपण  नुकसान ग्रस्त शेतक-यानां शासना मार्फत मदत मिळवून देण्यासाठी आ. बबनदादा शिंदे यांच्या मार्फत प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. यावेळी माढा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती – बाळासाहेब शिंदे, उपसरपंच – शिवाजी बारबोले, चेअरमन – विठ्ठल शिंदे, अशोक शिंदे, राजेंद्र गुंड ,  भाऊराव शिंदे, आप्पाराव आजुरे, विजय शिंदे, रमेश चव्हाण गुरूजी, मोहन चव्हाण गुरूजी आदीसह ,ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *