दारफळच्या नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक – शिंदे यांचे निधन


दारफळ(प्रतिनिधी): – नवभारत विद्यालय दारफळ (ता. माढा) येथील कार्यरत मुख्याध्यापक – राजेंद्र तुकाराम शिंदे यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी ०१ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. च्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक बहीण, एक मुलगा , एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.मागील २५ दिवसापासून यशोधरा रुग्णालय सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार चालू होते. परंतू मृत्यूशी चाललेली त्यांची झुंज अपयशी ठरली.
माढा तालुक्यातील दारफळ सीना या गावचे शिल्पकार साथी कै. तुकाराम (आण्णा) शिंदे यांचे ते सुपुत्र होत . तसेच कुर्डूवाडी पं.सं. चे माजी उपसभापती श्री.बाळासाहेब शिंदे यांचे कनिष्ठ बंधू होत.
राष्ट्र सेवा दलात जडण -घडण झाल्यामुळे सामाजिक कार्यात त्यांचा हिरहिरीने सहभाग होता. त्यांचे माध्यमिक शिक्षण नवभारत विद्यालयामध्ये तर B.Sc. चे शिक्षण दयानंद महाविद्याल सोलापूर येथे झाले. विद्यालयात गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन अतिशय सोप्या पद्धतीने करीत असल्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होते. त्यांचे वक्तृत्व , संभाषण, सूत्रसंचालन, अभिनय यात हाथकंढा होता. विद्यालयातील आजी -माजी विदयार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करीत होते.
त्यांच्या अशा जाण्याने जिल्हा मुख्याध्यापक संघ, गणित व विज्ञान अध्यापक मंडळ , आंतरभारती विद्यालय कुर्डूवाडी तसेच तालुक्यात सर्व शाळांनी हळहळ व्यक्त केली. नवभारत विद्यालय दारफळ व ग्रामपंचायतच्या वतीने राजेंद्र शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *